एस. टी. वर्कर्स काँग्रेसची राज्यस्तरीय कार्यकारिणी जाहीर, बीड जिल्ह्यातील तिघांवर मोठी जवाबदारी

एस. टी. वर्कर्स काँग्रेस ची राज्य स्तरीय कार्यकारिणी जाहीर, बीड जिल्ह्यातील तिघांवर मोठी जबाबदारी .

नाशिक. दि -13-03-2025 : एस. टी. वर्कर्स कांग्रेस ची स्थापना करण्यात आलेली आहे, या संघटनेची नवीन राज्यस्तरीय कार्यकारिणी नाशिक येथे जाहीर करण्यात आली. कार्यकारिणी मध्ये बीड जिल्ह्यातील पाटोदा आगार येथील तिघांवर मोठी जवाबदारी देण्यात आली.

त्यात गणेश चवरे यांची संघटनेच्या राज्यस्तरीय कार्यकारिणी सदस्य पदी नेमणूक करण्यात आली तसेच भारत सुरवसे यांची संघटनेच्या सोशल मीडिया प्रसिद्धी प्रमुख महाराष्ट्र राज्य या पदावर नेमणूक देण्यात आली. बीड विभागीय जिल्हा सचिव पदी एकमताने श्रीकांत येडे यांची तर अध्यक्ष पदी सुदाम खाडे यांची निवड करण्यात आली. तसेच राजा काशीद यांना ही एक जबाबदारी मिळाली याबाबत चे नेमणूक पत्र जयप्रकाश छाजेड एस. टी. वर्कर्स काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिश छाजेड आणि सरचिटणीस आर. डी. गवळी. यांच्या मार्फत देण्यात आले.

लवकरच बीड जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल असे त्यांनी सांगितले कर्मचाऱ्यांच्या वेतन, महागाई भत्ता सोबतच मूलभूत प्रश्नांबाबत लवकरच सोडवणूक करण्यासाठी प्रशासनासोबत बैठक घेण्यात येणार असल्याचे अध्यक्ष छाजेड म्हणाले.

आगारामार्फत सत्कारमूर्तिचा सत्कार .

पाटोदा आगारातील कर्मचाऱ्यांमार्फत नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बाळु डफळ, रंजित राऊत, वसंत मडावी, रमेश सानप, रसूल शेख, शरद चौरे, गजानन चौरे, आसद खान, गायकवाड असे सर्व यांत्रिकी कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 

Leave a Comment